नोव्हेंबर मध्ये १९००० पदांची महाभरती होणार ! – MPSC Recruitment 2021

[ad_1]

MPSC Recruitment 2021 Latest Update

MPSC Recruitment Latest Updates & Details – आत्ताच प्राप्त नवीन अपडेट नुसार राज्य सरकारच्या महसूल, कृषी, पशु संवर्धन, शालेय शिक्षण व क्रिडा, मराठी भाषा, सार्वजनिक आरोग्य, मेडिकल, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा यासह विविध 43 विभागांमधील जवळपास 18 हजार 743 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील आठवड्यात पाठविली जातील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

या बद्दल लेटेस्ट अपडेट्स महाभरती वर प्रकाशित होतच रहातील, तेव्हा महाभरतीची अधिकृत अँप लगेच येथे क्लिक करून आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा !!

राज्य शासनाच्या गृह विभागात जवळपास 29 हजार, आरोग्य विभागात 20 हजार 594, जलसंपदा विभागात 21 हजार, कृषी विभागात साडेचौदा हजार, महसूल विभागात 13 हजार तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागात 8 ते 10 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाजित नऊ हजार पदे रिक्‍त आहेत. सद्यस्थितीत जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त असून मागील काही वर्षांत त्याची भरतीच झालेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांची मेगाभरतीची घोषणा केली, परंतु पुढे काहीच झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने जवळपास एक लाख पदांच्या भरतीची घोषणा केली, परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.


Maharashtra Public Service Commission published an advertisement under Maharashtra Civil Engineering Services Main Examination 2021 for the recruitment process under WRD, PWD Departments. Online Applications are invited for filling up the (Civil : 217 + Main :200) 417 vacancies of these posts to be filled up by the Commission. Interested applicants are need to apply online by given link. The Last date for online applications is 28th September 2021.

महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021 अंतर्गत येथे विविध पदाच्या एकुण (सिव्हिल २१७ + मेन २००) 417 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 सप्टेंबर 2021 पर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC अंतर्गत 229 पदांची भरती सुरु

 • परीक्षेचे नाव – महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2020 आणि राज्य सेवा मुख्य परीक्षा 2020
 • पद संख्या –सिव्हिल २१७ + मेन २०० – एकूण 417  जागा
 • वयोमर्यादा – 19 वर्ष ते 38 वर्ष
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन अर्ज लिंक दिलेली आहे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 सप्टेंबर 2021
 • फीस : 
  • Open category – ₹ 544/-
  • Reserved category – ₹ 344/-

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Main Recruitment 2021

📑 PDF जाहिरात (मेन)
https://bit.ly/2WIuj5l
📑 PDF जाहिरात (सिव्हिल)
https://bit.ly/2nIuj8l
✅ ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3mXrwAb

 


Assistant Motor Vehicle Inspector Main Examination 2020 

MPSC Recruitment 2021  : Maharashtra Public Service Commission is invited online application for the Assistant Motor Vehicle Inspector Main Examination 2020. There are a total of 240 vacancies available to fill. Applicants apply online mode before the 20th of September 2021 26th September 2021 (Date Extended). Further details are as follows:-

जाहिरात क्र. 02/2020, दिनांक 17 जानेवारी, 2020 नुसार शासनाच्या गृह (परिवहन) विभागांतर्गत मोटार वाहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षक, गट-क संवर्गातील नमूद केल्याप्रमाणे एकूण 240 पदांवरील भरतीकरिता, महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत दिनांक 15 मार्च 2020 रोजी घेण्यात आलेल्या सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा 2020 च्या निकालाआधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 शनिवार, दिनांक 30 ऑक्टोबर 2021 रोजी औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 6 सप्टेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 26 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ) आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा – 834 पदे 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • परीक्षेचे नाव – सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020
 • पद संख्या – 240 जागा
 • परीक्षेची तारीख – 30 ऑक्टोबर 2021
 • परीक्षा केंद्रे – औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 6 सप्टेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2021 26 सप्टेंबर 2021 (मुदतवाढ)
 • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For MPSC Recruitment 2021

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/2WIuj5l
✅ ऑनलाईन अर्ज करा (From 6th Sep)
https://bit.ly/3mXrwAb

 


MPSC Recruitment 2021  : The Maharashtra Secondary Service Non-Gazetted, Group-B Joint Pre-Examination 2020 is being held on September 4. The Commission has clarified that the admission certificate for this examination will be made available to the concerned candidates in a suitable manner other than the account of the candidates on the new website.

राज्य लोकसेवा आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरील खात्याचा पासवर्ड व खात्यातील तपशील अद्ययावत करण्याची सूचना उमेदवारांना यापूर्वी देण्यात आली आहे. या सूचनेनुसार खाते अद्ययावत करत असताना जुन्या खात्यामध्ये नोंदविलेला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी चुकीचे नोंदविल्याने, ज्ञात नसल्याने किंवा दोन्ही बंद असल्याने ओटीपी प्राप्त होण्यास आणि पर्यायाने पासवर्ड बदलण्यामध्ये उमेदवारांना गेल्या काही दिवसांत अडचणींना सामोरे जावे लागले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळावर उमेदवारांचे खाते अद्ययावत करताना उमेदवारांना अडचणी येत आहेत. दरम्यान येत्या चार सप्टेंबर रोजी ‘महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२०’ घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी प्रवेश प्रमाणपत्र नवीन संकेतस्थळावर उमेदवारांच्या खात्याव्यतीरिक्त अन्य सुयोग्य पद्धतीने संबंधित उमेदवारांना उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

पासवर्ड बदलून खाते अद्ययावत करता येत नसल्यामुळे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी बदलून मिळावा, याकरिता उमेदवारांकडून आयोगाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात प्राप्त होत असलेल्या कॉल्समुळे टोल फ्री क्रमांक सतत व्यस्त राहत असल्याने आयोगाच्या सुविधा केंद्राकडून उमेदवारांना इच्छित सेवा पुरविण्यातही अडचणी येत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अवघ्या काही दिवसांवर परीक्षा आल्याने परीक्षेसाठीप्रवेशप्रमाणपत्र आपल्याला मिळणार का?, असा प्रश्न उमेदवारांकडून विचारला जात आहे. त्यावर आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

उमेदवारांना स्वत: ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्याची सुविधा पुढील सप्ताहापासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यानंतर उमेदवारांना स्वत: खाते अद्ययावत करता येणार आहे, असेही आयोगाने कळविले आहे.


MPSC Retotaling Application Form

MPSC Recruitment 2021  : Maharashtra Public Service Commission has issued a circular regarding the submission of an application for the Retotalling of marks. A web link has been made available for the candidates who want to revise the marks in the main examination. Candidates should submit their applications by August 22, 2021.

MPSC परीक्षांकरिता गुणांची फेरपडताळणी अर्ज लिंक उपलब्ध!! 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गुणांची फेरतपासणीसाठी अर्ज सादर करण्याबाबत परिपत्रक जाहीर केले आहे. उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याबाबत उमेदवारांच्या नावासह सुधारित यादी आयोगाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेली आहे. जे उमेदवार शारीरिक आणि मुलाखतीमध्ये पात्र आहेत, त्यांच्या गुणांचे मार्कशीट ऑनलाईन सुविधांमध्ये (Online Facilities) उपलब्ध आहेत. मुख्य परीक्षेतील गुणांची फेरपडताळणी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता वेबलिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी 22 ऑगस्ट 2021 पर्यंत आपले अर्ज सादर करावे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा

 

जाहिरात – https://bit.ly/3B0cJc5


MPSC Rajyaseva Vacancy Details 

MPSC Recruitment 2021  : There is a growing demand for more seats for the students who are out of the competition. Minister of State for General Administration Dattatraya Bharane is also trying to increase the number of seats and will hold a meeting of concerned officials on Wednesday. Further details are as follows:-

MPSC राज्यसेवेच्या जागा वाढवण्यासंदर्भात उद्या बैठक!! फेरनिकालातून स्पर्धेबाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही संधी मिळावी म्हणून जागा वाढविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatraya Bharane) हेदेखील जागा वाढविण्यासंदर्भात प्रयत्नशील असून, बुधवारी (ता. 18) ते यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

MPSC नेही सामान्य प्रशासन विभागाला रिक्‍त पदांचे मागणीपत्र सादर करण्यासंदर्भात पत्र पाठविले आहे. त्यानुसार आता दहा विभागांमधील रिक्‍त पदांची आरक्षण पडताळणी करून उच्चस्तरीय समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस व खुल्या प्रवर्गातून संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने फेरनिकाल तयार केला. अभियांत्रिकी पूर्वपरीक्षेच्या निकालाला काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले असून, सध्या त्याला स्थगिती आहे. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल आयोगाने तयार केला आहे, परंतु अजून जाहीर झालेला नाही. तत्पूर्वी, राज्य सरकारने “गट-ब’ संवर्गाच्या रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला देणे अपेक्षित आहे.

मार्च 2021 मध्ये पार पडलेल्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत पोलिस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, तहसीलदार अशा पदांची संख्या खूपच कमी होती. राज्यातील या अधिकाऱ्यांच्या रिक्‍त पदांचे मागणीपत्र वेळेत आयोगाला सादर झाल्यास स्पर्धेतून बाहेर जाणाऱ्या अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे. आयोगाने रिक्‍त पदांचे मागणीपत्र सादर करण्यासंदर्भात सामान्य प्रशासनाशी पत्रव्यवहार केला असून, त्यानुसार दहा विभागांकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित केली जात आहे. तत्पूर्वी, त्या रिक्‍त पदांची आरक्षण पडताळणी करून त्याला उच्चस्तरीय समितीची मान्यता घ्यावी लागणार आहे. मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर “एसईबीसी’ प्रवर्ग रद्द झाला. तर “एनटी-ब, क, ड’ प्रवर्गातील उमेदवारांनाही त्यांच्या टक्‍केवारीत जागा न मिळाल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरक्षण पडताळणी काटेकोर करावी लागेल, असेही सामान्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Ten departments of the state government have been asked to provide information on their vacancies in Group-B. The concerned departments are expected to inform the general administration before September 30. A demand letter will be sent to the Maharashtra Public Service Commission accordingly. This has been expressed by senior officials of the General Administration Department. 


MPSC Recruitment 2021 Preference Order

MPSC Recruitment 2019 Preferences order GR Notifications is published by MPSC For the Civil Services Exam, MPSC Van Seva & MPSC Main Exam. The details about this GR is given below. 

MPSC Deputy Registrar, Stamp Inspector Recruitment 2021

MPSC Recruitment 2021  : A decision was taken in the Cabinet meeting held on Wednesday to fill the posts of Deputy Registrar (Class-I) / Stamp Inspector, Group-B (Non-Gazetted) of the Registration and Stamp Department through the Maharashtra Public Service Commission. The meeting was chaired by Chief Minister Uddhav Thackeray. Further details are as follows:-

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. हा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी ही पदे सरळसेवेतून भरली जात होती. नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील सरळ सेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला.

महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात भरती

दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. या विभागात १६ रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २६ ऑगस्टपर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन माध्यमातून स्वीकारले जाणार आहेत. यासंदर्भातील सविस्तर माहिती https://mpsconline.gov.in आणि https://mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. उमेदवाराच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांसदर्भातील माहिती https://mpsc.gov.in वेबसाइटवर उपलब्ध आहे.


MPSC Application Form

MPSC Recruitment 2021  : The Maharashtra Public Service Commission (MPSC) has taken an important decision. Accordingly, it has been made mandatory for the candidates to attach their documents and certificates along with the pre-examination application for the posts for which advertisements will be published. Candidates will not be able to apply without the documents and certificates. 

कागदपत्रे, प्रमाणपत्रांसंदर्भात होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार ज्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील त्या पदांच्या पूर्व परीक्षेच्या अर्जासह उमेदवारांना त्यांची कागदपत्रे, प्रमाणपत्रे जोडणे अनिवार्य करण्यात आले असून, कागदपत्रे, प्रमाणपत्रांशिवाय उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

MPSC भरती सुरु; त्वरित अर्ज करा

आयोगाकडून संके तस्थळाच्या माध्यमातून नवी अर्ज प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयोगाने अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत उमेदवारांना अर्ज भरताना सोबत कागदपत्रे, प्रमाणपत्रे अपलोड करावी लागत नव्हती. मात्र आता अर्ज भरतानाच कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अपलोड करावी लागणार असल्याचे आयोगाने पदभरती प्रक्रियेतील नोंदणीसंदर्भातील सूचनांमध्ये नमूद केले आहे.

ऑनलाइन अर्जासाठी आयोगाच्या संके तस्थळाद्वारे अर्ज सादर करताना शालांत प्रमाणपत्रावर असलेल्या नावाप्रमाणेच अर्ज करावा लागेल. आयोगाच्या अर्ज प्रणालीवर नोंदणी केलेली नसल्यास आधी नोंदणी करणे आवश्यक आहे. खाते तयार केलेले असल्यास ते अद्ययावत करावे लागेल.

खात्याद्वारे केलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवाराची पात्रता पडताळणी के ल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना सोबत अपलोड करायची शैक्षणिक कागदपत्रे, वयाचा पुरावा, आरक्षणासंदर्भातील पुरावा, क्रिमिलेयर किं वा नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र पुरावा, दिव्यांग असल्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणाचा पुरावा, अनाथ आरक्षण पुरावा, मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, अधिवास प्रमाणपत्र, विवाहित स्त्रियांच्या नावात बदलाचा पुरावा आदी कागदपत्रे-प्रमाणपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच कागदपत्रे प्रमाणपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज करता येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.


MPSC Recruitment 2021 Details 

MPSC Recruitment 2021 : All MPSC posts will increase. The Number of Posts under MPSC Recruitment 2021 may increase. The Details about this will be available soon. 

राज्य सरकारच्या सेवेतील रिक्त पदे भरण्यासाठी दि. १५ ऑगस्टपर्यंत ‘एमपीएससी’कडे (MPSC) संबंधित विभागांनी प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज दिले. यामुळे एमपीएससी परीक्षा घेण्याचा मार्ग खुला झाला असून जागांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता आहे.

राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या विविध विभागांतील रिक्त पदांपैकी उपसमितीने परवानगी दिलेल्या रिक्त पदांसह, उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या आकृतिबंधातील पदे भरण्यासाठी विशेष बाब म्हणून दि. ४ मे २०२१ आणि दि. २४ जून २०२१ च्या शासन निर्णयांतून सूट देण्यात यावी.

ही पदे भरताना न्यायालयाच्या सर्व निकालांचा विचार करुन कोणत्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना पवार यांनी दिल्या

 

सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, पोलीस आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये ज्याप्रमाणे वर्ग तीन आणि चारची पदे विभागास भरण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे वर्ग एकची व अन्य पदांची भरतीप्रक्रिया वेगाने सुरू करण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याची माहितीही पवार यांनी दिली.

MPSC Bharti Age Limit Details 

राज्य सरकारकडून एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशोक चव्हाण यांनी विधानपरिषदेत बोलताना ही माहिती दिली. एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची मयोवर्यादा ४३ पर्यंत वाढवली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने यासाठी मान्यता दिली आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकशित करू…

The post नोव्हेंबर मध्ये १९००० पदांची महाभरती होणार ! – MPSC Recruitment 2021 appeared first on महाभरती…

[ad_2]

Leave a Comment